माझ्यात खेळतात माझी रूपे निराळी
मी काय नाटकाचे आता प्रयोग पाहू.....
झाली दशाही आता माझी तुझ्या परीरे
मी काय हासण्याचे आता सुयोग पाहू....
ते स्वर छेडताची दाटूनी कंठ येतो
मी काय जीवनाचे आता वियोग गाऊ....
नजरेत जर तिच्याही असेल भास खोटा
मी का भेटण्याचे निस्वार्थ योग पाहू....
नाही, जरासा मीही भितो या जिवनाला
मी का जगावयाचे खोटे अभोग गाऊ......
4 comments:
kaay re mitra itakya gambhiryapurna kavita kartos,tu varun chachal aahes pan aatun agadhich .....................
changala khel aahe .aavadalaa aapalyaalaa.ha khel ajunparyant konich samaju shakala naahi tar tu tari kasa samjhashil.....nadipramaane vahat rahayach hech jivan aahe nisvarth.
आचार्य अत्र्यांच्या ’प्रेमाचा गुलकंद’ चाखणाऱ्या प्रेमीचाच दुसरा अवतार म्हणजे तुझ्या कवितेतील हा प्रेमी. हा तिची वाट पाहत नाही, आणि खचूनदेखील जात नाही. किंबहुना नव्याने आयुष्य जगण्याविषयीची दुर्दम्य आशा बाळगतो.हिच तुझ्या कवितेतील आशावाद मराठी सारस्वतात नवचैतन्य निर्माण करेल.
तुझ्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दीक शुभेच्छा.
really very excellent poems !!
Post a Comment