Tuesday, July 21, 2009

.....दुरावा...

वाटे हवा हवासा जगण्यातला दुरावा
मी सत्य आहे याचा काय देवू पुरावा,
जगण्याचा माझ्या आहे हेतू जरा निराळा
फक्त विचार माझा माझ्या मागे उरावा,
ठरले असेल खोटे कित्येक बोलणे माझे
मर्म बोलण्याचा तुला तरी कळावा,
समजूत या मनाची घालू कशी मी आता
घडलेल्या त्या कथेचा विसर कसा पडावा,

3 comments:

vaibhav said...

भावनेला शब्दांमधे सुदंरपणे सकारले आहे.

Unknown said...

simple bt too the target...:P

Unknown said...

simple n to the target...