Friday, May 1, 2020

प्रवाह

विश्वाच्या प्रवाहात
अविरत
वाहणाऱ्या अनेकानेक
स्थूल आणि सूक्ष्म घटकांच्या
अंशाचा एक अंश
असलेला
प्रत्येक "मी" जेव्हा
खूप मोठा होऊन बसतो,
सर्वात महत्त्वाचा
भाग असल्याचा अनुग्रह आणि परिग्रह
करीत संपूर्ण आयुष्यभर
या प्रवाहापासून
स्वतःला विभक्त
समजून
हे जीवनचक्र
पुर्ण करण्याचं
श्रेय मिळवण्याची
धडपड करतो
तिथेच राहतं
एक अपूर्ण वर्तुळ
एका अनाकलनीय नात्याचं .!
माझं आणि त्या प्रवाहाचं नातं.

No comments: