Wednesday, May 20, 2009

सर

आयुष्याच्या वळणावरती
पाऊल माझे डगमगेल जेव्हा
तुमची आठवण येईल तेव्हा
सर तुमची आठवण येईल तेव्हा...

असेन मी एकटा
नसेल कोणी सोबती
वळून मागे फिरेन जेव्हा
तुमची आठवण येईल तेव्हा
सर तुमची आठवण येईल तेव्हा...

कोण इथे तत्वज्ञानी
होतो सांगा जन्मत:
मी माझा विचार करेन जेव्हा
तुमची आठवण येईल तेव्हा
सर तुमची आठवण येईल तेव्हा...

माझ्या या असण्यातही
कित्येकांचे उपकार आहे
एक-एक नाव मी घेईन जेव्हा
तुमची आठवण येईल तेव्हा
सर तुमची आठवण येईल तेव्हा...

4 comments:

Amrita said...

wow
mastach ree
he kavita majhya tarfe pan aikav siranna.

pramod said...

solid yaar...! tuzi kavita jar kusumagrajani vachali asati tar tyana aaj nishchitach aanand zala asata.marathi sarsvatana sajesa eka pratibhavan kavi janmas aala.

Anonymous said...

Khupach chan sir 👌👌👌

Anonymous said...

Kharay 👍