काळजांचे इंद्रधनुष्य मी पाहीले
प्रत्येकाचे रंग वेगळे मी पाहीले.
या बेढंग दुनियेत जरी मी बेरंग असा
तरी माझेच रंग मी प्रत्येकात पाहीले,
जगलो,
जगलो जीवन जरी एकटाच मी
एकांतात माझ्या विश्व मी पाहीले,
असो,
असो महल तुझा लाख कोटिचा
घरट्यास का माझ्या तुच्छ तु पाहीले
हसतात,
हसतात मैफिलीत जे मोठ्याने
डोळ्यांत त्यांच्या नेहमी अश्रृ मी पाहीले,
2 comments:
पहील्या कड्व्यात जान आहे..
काळ्जातला इंन्द्रधनुष्य खरचं रंगीन आहे..
काळ्जातला इंन्द्रधनुष्य खरचं रंगीन आहे..
Siddhu Dipke
Post a Comment