१)
स्वतःपुरतं जगतांनाही
एक गोष्ट लक्षात आहे..
या जगात प्रत्येक जीव
माझ्या सारखा निस्वार्थ आहे...
२)
ईजा मला भरपूर झाल्या
माझ्या लहानपणी...
त्यांचीच साथ झाली मला
माझ्या शहाणपणी....
३)
प्रत्येक घटनेचा जगण्यावर जर
सखोल परिणाम झाला असता....
कदाचित माझ्या जगण्याचा तिथेच
विराम झाला असता.....
४)
जगण्याच्या बर्याच अर्थांना
मी जगतांना मुकलो आहे...
याचा अर्थ मी जगतांना
बर्याचदा चुकलो आहे...????
५)
स्पष्ठ बोलणारे अधिक
आवडाया लागले...
अस्पष्ठ बोलण्याचे जेंव्हा
स्वार्थ कळाया लागले...
६)
स्वार्थ जगण्याचे अनेक
टाळतो नेहमी...
तरी नियम जगायचे
पाळतो नेहमी...
७)
एकदा तरी जाता जाता
जर तू मागे वळली असती...
प्रीत माझ्या हृदयातली
सहज तुला कळली असती....
4 comments:
ABE KAY JABARDAST HAYET RAJA , DEWACHI SHAPPAT
EKDAM CHAN
ekdum sahi ahet saglya asach lihit raha I specially liked the last one
चार ओळी बरच काही सांगताहेत...अगदी मनापर्यन्त पोहचतायत...
Post a Comment