Tuesday, December 22, 2009

कला

परखूनी घेतो मी प्रिये
माझे मीच मला
आयुष्य जगण्याची आता
हीच खरी कला,
होतो उदास एकटा
मी जरी असा कधी
नाचून घेतो, गाऊन घेतो
वाचून घेतो मीच मला,
राहुदे शब्द माझे
सारे सखे तुझ्याकडे
जाता जाता देऊन जा
कविता माझी तीच मला,

No comments: