वाद झाला आज पुन्हा त्याचा आणि माझा .....
म्हणजे संवाद दररोज होतच असतो....पण आजचा वाद....
होता त्याच्या आणि माझ्या अस्तित्वाबद्दलचा.......
म्हणे माझ्यावाचून तुझे पानंही हलणार नाही.....
मी का ऐकून घ्यावं त्याचं...???..
त्याच्यामुळेच माझं अस्तित्व आहे म्हणे...
म्हणजे मी कोणीच नाही..???
माझा ....आत्मसन्मानही त्याचीच कृपा आहे म्हणे......
मी तुझ्यावर हुकूम गाजवतो... ’मन’ असलं म्हणून काय झालं....
मग वाट्टेल ते बोलेल आणि मी ऐकून घेऊनिमूटपणे.....?
नाही जमणार.....
हो वाद झाला आज पुन्हा त्याचा आणि माझा.....??
No comments:
Post a Comment