अनंताचे आपण करावे स्मरण
मिळेल आधार नश्र्वरासी .!
मिळूनी सर्वासी करावे समान
कशाला चढाओढ भौतिकाची !
जाणती जे मर्म धर्मोपासनेचे
कधी ना कुणाला दुःख देती !
असावे जगासी बसावे एकांती
रहावी सदा जोड साधनेची !
असावे आनंदी सदा आत्मनाने
असुद्यावी गोडी चिंतनाची !
नभासी भिडावे मातीत रुजावे
जपावे हे नाते निसर्गाशी !
मिळेल आधार नश्र्वरासी .!
मिळूनी सर्वासी करावे समान
कशाला चढाओढ भौतिकाची !
जाणती जे मर्म धर्मोपासनेचे
कधी ना कुणाला दुःख देती !
असावे जगासी बसावे एकांती
रहावी सदा जोड साधनेची !
असावे आनंदी सदा आत्मनाने
असुद्यावी गोडी चिंतनाची !
नभासी भिडावे मातीत रुजावे
जपावे हे नाते निसर्गाशी !
No comments:
Post a Comment