
झोक्यावर आठवणींच्या मन माझे जेव्हा झुलते
एक-एक तुझी मग तेव्हा मज भेट प्रिये स्मरते,
कधी एके काळी तुझ्यासवे ज्या ज्याही ठिकाणी बसलो
एकाकी तिथेही तेव्हा मन माझे जावुनी बसते,
एक-एक तुझी मग तेव्हा....
ओठात तुझ्याही आज प्रिये माझेही नाव असावे
स्मरते ही बाब जेव्हा मन माझे खुदकन हसते,
एक-एक तुझी मग तेव्हा.....
संपला तो खेळही जीवलगे संपली ती रात सुहानी
अंधारल्या पहाटे मन माझे तीळ तीळ जळ्ते,
एक-एक तुझी मग तेव्हा.....
झोक्यावर आठवणींच्या मन माझे जेव्हा झुलते
एक-एक तुझी मग तेव्हा मज भेट प्रिये स्मरते,
एक-एक तुझी मग तेव्हा मज भेट प्रिये स्मरते,
4 comments:
very very nice poet and tu to .....chagaya...
you always do appreciating job i suppose.
send this link on your mcj group too.
keep on updating your blogs, as u have 'n' number of original writings of your own.
at the same time, take care too that ur material is copyrighted.
bhai diz iz toooo good man
Evadyashya ayushyat khup kahi hav asat..pan hav asat tech milat nasat......hav tech milal tari khup kahi kami asat......chandanyani bharbharun suddha apal abhal rikam asat........mahesh too good...ur very kind hearted....tujhya kavitan madhun te disun yet....nice..
Post a Comment