Saturday, January 8, 2011

अंदाज

न भेटताच निरोप घेशील असं वाटलं होतं...पण भेटून निरोप घेतलास हे बरं केलंस..तुझ्या बाबतीत माझे अंदाज चुकतात हे तू पुन्हा सिद्ध केलंस...तुला आठवते आपली पहिली भेट, कशी आठवेल? तुझ्यासाठी तेवढी महत्त्वाची नसेल कदाचित .पण मी मात्र आतुरतेने वाट पाहत असावा त्या क्षणाची.. तु आलीस आणि पहिला अंदाज तिथेच चुकला माझा.. तुझ्या न येण्याचा... असे अनेक अंदाज तु हिमतीने मोडून पाडलेस..आणि मी मात्र जुगाऱ्यासारखा खेळत होतो माझ्याच भावनांशी... अंदाज..!!!, किती छान आहे ना हा शब्द.. संपूर्ण जग या शब्दाच्या अधिपत्याखाली आल्यासारखं भासतं बरेचदा... एक सांगू खरंतर मी आता कुठलाही अंदाज मनाशी बाळगत नाही.. कारण माझे अंदाज काही खरे ठरत नाही...

No comments: