मी कधीतरी येईन तुझ्या भेटीला तेव्हा असेल माझ्यासोबत तुझ्या स्वप्नांचं जग..
जे मी आता अस्तित्वात साकारलं आहे...तुला आवडणारी गाणी..रंग..शब्द..संगीत..असतील सोबतीला...
तुझ्या नजरेतील त्या घरट्याची सावली हुबेहूब उभी असेल...
तुझ्या स्वप्नातील “मी” मात्र “तो” तसा नसेन कदाचित कारण
तुझ्या स्वप्नांना अस्तित्वाचा आकार देता-देता मी पण त्या अस्तित्वाचा एक भाग झालेला असेन...
आणि अस्तित्वातला मी तुझ्या स्वप्नातल्या त्याच्यासारखा होऊ शकणार नाही...
तरीही.. मी कधीतरी येईन तुझ्या भेटीला तेव्हा असेल माझ्यासोबत..
No comments:
Post a Comment