भेटलीस तू अचानक रोखल्या श्वासापरी
काळही मग थांबला लाजऱ्या भासापरी
अंतरीच्या वेदनेशी मी कधी न बोललो
राहूदे तिजला मनाशी एकटा असण्यापरी
ज्या दिशेने संथ वारा येत आहे आज हा
त्या दिशेवर प्रेम माझे असले तरी नसलेतरी
तो तुझ्या जगण्यातला ‘मी’ पणा गेला कुठे
स्वाभिमानी तू दिसावं असलातरी नसलातरी
No comments:
Post a Comment