Wednesday, November 21, 2018

काही केल्या जात नाही

काही केल्या जात नाही
गती कर्माची ती राही,

होई शांत-स्थीर-चित्त
मना सांग असे काही,

कुणा वाटेना मरावे
वाट जगण्याची पाही,

मन लागे माझ्याविना
अशी देशील का ग्वाही,

आली समीप जर का
सांग गुपीतही काही,

असे किनारा निवांत
खळखळून नदी वाही,

त्याच्या बासरीला भुले
राधा एकटीच नाही,

दिस सरला खोप्यात
वाट आईची ती पाही.

No comments: