कैवल्याची आस मनी निरंतर,
तरी नसे वान विचारांची !
कल्पियले असे, व्हावे समाधान,
गरजेला अशा अंत नसे !
कर्मासाठी उभा जन्म कमी पडे,
तरी त्यागवृत्ती सापडेना !
ऐसपैस झाली सुखाची साधने,
त्याशिवाय आता राहवेना !
उगाच पसारा मांडियेला जगी,
कशासाठी तूही धावतसे!
जोडले तुम्हास विश्वाशी कशाला,
एक प्रश्न मनी राही सदा !
एकाचे जे सुख, ते दुःख दुसऱ्याचे,
असे कसे हित स्वीकारावे !
सुख समाधान असावे समान,
असावे जगाशी एकरूप !
दुसऱ्याच्या ठाई माझेपण गेले,
काही न स्वतःचे स्वतःपाशी !
देह हे साधन, साध्य शोधण्यास,
अति त्याचे लाड करू नये!
तरी नसे वान विचारांची !
कल्पियले असे, व्हावे समाधान,
गरजेला अशा अंत नसे !
कर्मासाठी उभा जन्म कमी पडे,
तरी त्यागवृत्ती सापडेना !
ऐसपैस झाली सुखाची साधने,
त्याशिवाय आता राहवेना !
उगाच पसारा मांडियेला जगी,
कशासाठी तूही धावतसे!
जोडले तुम्हास विश्वाशी कशाला,
एक प्रश्न मनी राही सदा !
एकाचे जे सुख, ते दुःख दुसऱ्याचे,
असे कसे हित स्वीकारावे !
सुख समाधान असावे समान,
असावे जगाशी एकरूप !
दुसऱ्याच्या ठाई माझेपण गेले,
काही न स्वतःचे स्वतःपाशी !
देह हे साधन, साध्य शोधण्यास,
अति त्याचे लाड करू नये!
No comments:
Post a Comment