साधे सोपे करून घ्यावे जगणे अपुले
तरच कळावे लोकासी हे म्हणणे अपुले,
हा ही, तो ही प्रयत्न आता करून झाला
जगास नाही कळले काही करणे अपुले,
भटकंतीला कसला आला वेळ, काळ, पण
कधीच नाही कुणा उमगले फिरणे अपुले,
ना नुकसान, ना हानी कुणाची केली आम्ही
जगास नाही रुचले तरीही हरणे अपुले !
तरच कळावे लोकासी हे म्हणणे अपुले,
हा ही, तो ही प्रयत्न आता करून झाला
जगास नाही कळले काही करणे अपुले,
भटकंतीला कसला आला वेळ, काळ, पण
कधीच नाही कुणा उमगले फिरणे अपुले,
ना नुकसान, ना हानी कुणाची केली आम्ही
जगास नाही रुचले तरीही हरणे अपुले !
No comments:
Post a Comment